उस्मानाबाद – गरीब शेतकरी कुटुंबासाठी देवदत्त मोरे ठरले देवदूत !

उस्मानाबाद – गरीब शेतकरी कुटुंबासाठी देवदत्त मोरे ठरले देवदूत !

उस्मानाबाद – मुलीच्या लग्नाच्या विविंचनेत आडकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसाठी देवदत्त मोरे फाउंडेशनचे अध्यक्ष देवदत्त देवदूत म्हणून धावून आले आहेत. महिला शेतकऱ्याच्या मुलीचा विवाह फाउंडेशनने रविवारी (ता. १८) थाटात मोठ्या थाटात लावून दिला. तेरखेडा (ता. वाशी) येथे रविवारी (ता. १८) हा विवाह संपन्न झाला. भोगजी (ता. कळंब) येथील शेतकरी बाबुराव नामदेव चिलवंत यांच्या मुलीचा विवाह कचरू रंगनाथ धावारे यांच्या मुलाशी निश्चित झाला होता. दरम्यान चिलवंत कुटुंबियांकडे अत्यल्प शेती आहे. पाच महिन्यांपूर्वी ठरलेल्या

विवाहाची तयारी सुरू होती. दरम्यान खरीपाच्या पेरणीतून काहीतरी हातात येईल, या हेतूने विवाहाचे नियोजन केले होते. मात्र अपुऱ्या पावसाने सोयाबीनचे पिकही हातचे गेले होते. जेमतेम ३० ते ४० हजार रुपये पदरात पडले होते. त्यामुळे चिलवंत कुटुंबियांना लग्नाची चिंता सतावत होती. मुलीचा विवाह कसा करायचा, यासाठी नातेवाईक, पै-पाहुण्यांकडे मदतीची विनंती केली. तर बचत गटाचे कर्जही घेण्याचे नियोजन झाले. मात्र लग्नाची तारीख सात-आठ

दिवसांवर आली तरीही पैशाची काहीच तजवीज झाली नाही. मुलीची आई जयश्री यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न करण्यास असमर्थ असल्याची भावना झाली.त्यांनी पाच दिवसांपूर्वी स्वतःच्या शेतातील झाडाला साडीने गळफास घेतला. प्रसांगवधान राखत त्यांच्या मुलांनी आईचा फास सोडविला. आईचा जीव वाचल्याचा आनंद कुटुंबाला होता. मात्र लग्नाची चिंता मिटत नव्हती.

दरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांना याबाबतची माहिती समजली. त्यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष देवदत्त मोरे यांना याबाबत माहिती सांगितली. त्यांनी प्रत्यक्ष जावून चिलवंत कुटुंबियांची भेट घेतली. घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर फाउंडेशनने लग्नाची संपूर्ण जबाबादारी घेण्याचे आश्वासन दिले. रविवारी चिलवंत कुटुंबियांचे पालकत्व स्विकारीत त्यांचा विवाह तेरखेडा येथे मोठ्या थाटात लावून दिला. फाउंडेशनचे अध्यक्ष देवदत्त मोरे, प्रा. जगदीश गवळी, उपाध्यक्ष गोपाळ उबाळे, सचीव अविराज सुरवसे, ज्ञानेश्‍वर पतंगे, राजेश पवार आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. फाउंडेशनने विवाहामध्ये जेवनाचे साहित्य, कपडे, भांडी, मंडप, बँड आदी मदत दिली त्यामुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.

COMMENTS