शिवसेना कुठेच जाणार नाही, त्यांचे नखरे आम्हाला ठाऊक आहेत – मुख्यमंत्री

शिवसेना कुठेच जाणार नाही, त्यांचे नखरे आम्हाला ठाऊक आहेत – मुख्यमंत्री

नवी दिल्ली – शिवसेनेने तुमची साथ सोडली तर तुम्ही राज्यात काय कराल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी शिवसेना आमची साथ सोडणार नाही. शिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला ठाऊक आहेत आणि ते आमच्यासोबतच राहतील कुठेही जाणार नाहीत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजपाला अहंकार नडला अशी टीका पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी केली. मात्र आम्ही अहंकारी नाही आम्ही जमिनीला धरून असलेली माणसं आहोत असेही  फडणवीस यांनी म्हटले आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान सामनातले अग्रलेख वाचले तर वाटते की युती होणे अशक्य आहे याबाबत प्रश्न विचारला असता अहो म्हणूनच मी सामना वाचत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. असे असले तरीही आम्हाला त्यांचे सगळे नखरे ठाऊक आहेत ते आमची साथ सोडणार नाहीत असा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS