मी पण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर असंच वागायचो, तुम्ही जरा जास्त संयमानं घ्या – फडणवीस

मी पण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर असंच वागायचो, तुम्ही जरा जास्त संयमानं घ्या – फडणवीस

नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. कामकाज सुरु होताच. नागरिकत्व कायद्यावरुन विधानसभेत चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. विरोधकांपैकी कोण बोलेल यावरुन सभागृहात गदारोळ झाला. सुरुवातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलले. त्यानंतर मुनगंटीवार यांनी बोलायला सुरुवात केली परंतु फडणवीस यांनी मुद्दा मांडल्यानंतर तुम्ही कशाला मांडता असा सवाल विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यावर आक्रमक पवित्रा घेऊन फडणवीस यांनी अध्यक्ष महोदय तुम्ही जरा संयमानं घ्या. सभागृहात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. मुनगंटीवारही 33 हजार मतांनी निवडून आले असल्याचे म्हणाले.

दरम्यान मी पण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर असंच वागायचो, नंतर संयमानं घेतलं.
मी तर अंगावरही धावून जायचो. परंतु तुम्ही जरा जास्त संयमान घ्या तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला जास्त संयमानं घ्यावे लागणार असल्याचं विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले त्यानंतर मुनगंटीवार यांनी आपला मुद्दा मांडला.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं विरोध केला आहे. त्यामुळे हा कायदा लागू करण्यावरुन आज सभागृहात विरोधी पक्षाच्या बाकावर असलेल्या भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा ?

या वादग्रस्त कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय देण्याची तरतूद आहे. धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप सरकारनं म्हटलं आहे. मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका करत विरोध केला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख यांना भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे.

COMMENTS