अण्णांच्या शिष्टाईसाठी फडणवीस

अण्णांच्या शिष्टाईसाठी फडणवीस

अहमदनगर : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राळेगणसिध्दीमध्ये आण्णांची भेट घेतली

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. होता बराच काळ यावर चर्चा सुरू होती. मात्र, दिल्लीत केंद्रसरकारला आणि मैदानाची परवानगी मिळविण्यासाठी पाठविलेल्या पत्रांना उत्तर आलेच नाही. त्यामुळे आता दिल्लीला न जाता राळेगणसिद्धी येथेच ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे.

मधल्या काळात हजारे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली. सरकार आपल्याला दिलेली आश्वासने विसरले आहे, असे हजारे यांनी म्हटले होते. आता यासंबंधी हजारे यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. स्वत: निवदेन करून जुन्या व्हिडिओंच्या आधारे भाजपच्या नेत्यांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न हजारे यांनी केला आहे. त्यात गेल्या ५८ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने भाजप सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते.

COMMENTS