राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं भाजपमध्ये विलिनीकरण, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना दिला ‘हा’ सल्ला!

राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं भाजपमध्ये विलिनीकरण, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना दिला ‘हा’ सल्ला!

सिंधुदुर्ग – नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती भाजपमध्ये विलिनीकरण करण्यात आलं आहे. आजच्या दिवसांकडे अनेकांच्या नजरा लागून होत्या. राणेंचा प्रवेश कधी असं विचारलं जात होतं? मात्र ते भाजपचे अधिकृत खासदार आहेत. आधी नितेश यांचा भाजप प्रवेश झाला आणि आज निलेश आणि संपूर्ण महाराष्ट स्वाभिमानचा भाजपात प्रवेश झाला हे जाहीर करतो असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्याम सभागृहात कोकणाचा विषय हिरहिरीने, आक्रमकतेने मांडणाय्रा नितेश राणे यांना आता आमच्या शाळेत थोडे संयमाने वागावे लागेल, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच नारायण राणेंसोबत भरपूर काम केलं आहे. ते आक्रमक नेता आहेत, त्यांनी युवा आमदारांना प्रोत्साहन देण्याचे काम केलं. त्यांचे भरपूर प्रेम मला मिळाले. मध्यंतरी दुरावा आला असेल, पण वैयक्तिक संबंध चांगले राहिले असल्याचंही यावेळी फडणवी म्हणाले आहेत.

COMMENTS