कोरोना काळातही भ्रष्टाचार होत आहे – देवेंद्र फडणवीस

कोरोना काळातही भ्रष्टाचार होत आहे – देवेंद्र फडणवीस

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आज दिल्लीत 21000 टेस्ट दररोज होतात. महाराष्ट्रात 4500 टेस्ट केल्या जात आहेत. कमी टेस्टिंगमध्ये कोरोनाची संख्या दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना काळातही भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या संख्येने विज बिलं पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी येत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र जनसंवादाअंतर्गत भाजप मुंबई कोकण संवादाचे आयोजन केलं आहे. यावेळी फडणवीस बोलत होते.

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित ठेवला, मोदींजींनी भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी उपाययोजना केल्या. जे म्हणाले ते करुन दाखवलं. मोदींसारख्या कणखर नेतृत्वार देश सुरक्षित असल्याची भावना फडणवीसांनी व्यक्त केली. आत्मनिर्भर भारतअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवल्या केंद्र सरकार सर्व मदत करायला तयार होत, मात्र महाराष्ट्र सरकार अनेक ठिकाणी कमी पडलं असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

COMMENTS