मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचा वापर, कारवाई करणार का ?

मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचा वापर, कारवाई करणार का ?

कल्याण राज्य सरकारनं राज्यभरात प्लास्टिवर बंदी आणली आहे. त्यासाठी मोठा दंड आकारण्यात आला असून प्लास्टिकचा वापर करणा-यांकडून तो वसूल केला जात आहे. परंतु निय बनवणा-यांनीच नियम तोडले असल्याचं समोर आलं आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकच्या ग्लासांचा वापर कऱण्यात आला आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर करणा-यांवर आता कारवाई करणार का असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याचा शुभारंभ काल कल्याणच्या वरप गावात झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते. यावेळी प्लास्टिक बंदीला पाठ फिरवत या कार्यक्रमात प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. परंतु या सगळ्यांपैकी कोणालाच प्लास्टिक बंदी आठवली नसल्याचं दिसून आलं आहे.त्यामुळे आता सरकार यांच्याकडून दंड वसूल करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS