या कारणांनी फडणवीस घेतात धनंजय मुंडेबाबत मवाळ भूमिका

या कारणांनी फडणवीस घेतात धनंजय मुंडेबाबत मवाळ भूमिका

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिनेने बलाकाराचा आरोप केला. त्यानंतर मुंडे यांनी फेसबुक पोस्टवर शेअर करून खुलासा केला. मात्र, त्यामुळे विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशा वेळी प्रदेश भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली आहे. प्रत्येक घटनेनंतर आक्रमक भूमिका घेणारे फडणवीस धनंजय मुंडे यांच्याबाबत मावळ झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे. मुंडे यांनी या प्रकरणी कोर्टत गेल्याचं सांगितलंय, असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. त्यामुळं पोलिसांनी सर्व माहिती, सत्य बाहेर आणावं,’ अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्याबाबत मावळ भूमिका घेण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी पहिले कारण म्हणजे भाजपमध्ये गडकरी व मुंडे असे दोन गट होते. या दोन गटांपैकी फडणवीस हे गोपीनाथ मुंडे गटाचे म्हणून ओळखले जात होते. विधानसभेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात मुंडेंनी फडणवीसांना संधी दिली. त्यावेळी धनंजय मुंडे हे भाजपमध्ये होते. ते युवा मोर्चाचे काम करीत होते. तेव्हा फडणवीस त्यांच्या सोबत होते. दोघेही खांद्यालाखांदा लावून काम करीत होते.
धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्यानंतरही दोघेंची मैत्री अबाधित राहिली. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार असताना भाजपच्या एका गटाने धनंजय मुंडे यांचे काम केल्याचे बोलले जात आहे.

तसेच विधानसभेच्या निवडणुकीनंतर फडणवीसांना अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे बोलले जात होते. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत फडणवीस यांना पुर्वकल्पना होती का, असा ही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. तसेच याबाबत न्यायालयात केस दाखल असल्याने त्यातूनर येणारा निकाल मुंडे यांच्या बाजूने लागल्याने हे प्रकरण भाजपच्या नावाने शेकले जाऊन नये, असेही फडणवीस यांना वाटत असावे.

COMMENTS