तोडपाणी करणारा नेता असा उल्लेख करून फडणवीसांच‌े खडसेंवर शरसंधान

तोडपाणी करणारा नेता असा उल्लेख करून फडणवीसांच‌े खडसेंवर शरसंधान

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पक्षात कोंडी होत असल्याने त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. मात्र, त्यावेळी फडणवीसांनी त्यांना उत्तर देण्याचे टाळले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंवर अप्रत्यक्षरित्या हल्ला चढला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असताना भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदी एकनाथ खडसे होते. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्यावर टिका करताना तोडपाणी करणारा नेता असा उल्लेख केला. त्याची फडणवीसांनी आठवण करून दिली

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रवीण दरेकर भाषण करताना काहीसे दुखावलेले वाटले. शरद पवार जे बोलले त्यासंदर्भात आपल्याला वाईट वाटलं, पण अशा गोष्टींची काळजी करायची नसते. त्यांनी वडीलधाऱ्यांच्या नात्याने सल्ला दिला असं मानून, आपल्या कामाचा ठसा उमटत आहे असे समजून पुढे जात राहायचे. विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात असं बोलण्याची शरद पवार यांची ही सवय जुनी आहे. विरोधी पक्षनेते तोडपाणी करतात असे ते एका विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलले होते, पण तेच नेते आता त्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

COMMENTS