पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे खासगी गाडीतून

पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे खासगी गाडीतून

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर त्यांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या आडचणीत वाढ झाल्याने मुंडे यांनी बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर ते आपल्या खासगी गाडीतून शासकीय बंगल्यावर दाखल झाले.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडली. दरम्यान,भाजपच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली. राजीनाम्याची मागणी होऊ लागल्याने धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली. धनंजय मुंडे यांनी पवारांची भेट घेतल्यावर पवारांनी त्यांना नेमका काय सल्ला दिला? किंवा धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणावर आता शरद पवार काय बोलणार? काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, रात्री उशिरा आपल्या शासकीय बंगल्यावर खासगी गाडीतून आलेल्याने चर्चेला उधाण आले आहे

COMMENTS