धनंजय मुंडेंच्या सूचनेवरून बीडमधील सामाजिक न्याय भवनात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी नियंत्रण व मदत कक्ष सुरू !

धनंजय मुंडेंच्या सूचनेवरून बीडमधील सामाजिक न्याय भवनात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी नियंत्रण व मदत कक्ष सुरू !

बीड – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत व नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बीड येथील सामाजिक न्याय भवनात सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या नेतृत्वाखाली मदत व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्याअनुषंगाने सुरू असलेले लॉकडाऊन यामुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असणार आहे अशी माहिती बीडचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली.

बीड येथील समाज कल्याण कार्यालय (सामाजिक न्याय भवन) येथील ०२४४२ २२२६७२ हा दूरध्वनी क्रमांक कार्यालयामार्फत देण्यात आला आहे. तसेच ९८६७८ १०६०० आणि ७७२०८ ३९१५५ हे दोन व्हाट्सअप्प क्रमांकही कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत. संचारबंदी कालावधीमध्ये कोणत्याही दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिक व्यक्तीने मदतीसाठी फोन/ व्हाट्सअप्प वर संपर्क करतेवेळी आपले सम्पूर्ण नाव, गाव, पूर्ण पत्ता व आपली समस्या नमूद करावी जेणेकरून समस्या निवारणास मदत होईल असे आवाहन दिव्यांग नोडल अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके व सहाय्यक समाज कल्याण आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

COMMENTS