सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, संपर्कातील काही मंत्री होम क्वारंटाईन !

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, संपर्कातील काही मंत्री होम क्वारंटाईन !

मुंबई – ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.यापूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.
धनंजय मुंडे हे देखील लवकरच कोरोनाला हरवतील अशी आशा आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या काही मंत्र्यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. 10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. वर्धापन दिन आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

मंत्रालयाच्या समोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश असून मुंडे यांच्यासह सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

COMMENTS