ज्या गावाने वनवास दिला त्या गावानेच फुले देऊन स्वागत केले – धनंजय मुंडे

ज्या गावाने वनवास दिला त्या गावानेच फुले देऊन स्वागत केले – धनंजय मुंडे

बीड – आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या गावाल भेट दिली. यावेळी गावातील नागरिकांनी धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत केले. गावक-यांचं हे स्वागत पाहून धनंजय मुंडे यांनी आपण भारावून गेलो असल्याचं म्हटलं आहे. तसेच ज्या गावाने वनवास दिला त्या गावानेच सत्कार केला असल्याचंही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान स्व. गोपीनाथराव मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करणारं अशी या गावाची ओळख आहे. या गावात खूप दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी एन्ट्री मारली. ज्या गावाने कधी काळी नाकाबंदी केली होती. त्याच गावात आज फुले देऊन स्वागत केले. हवा बदल रही है असे म्हणत देवांनाही वनवास भोगावा लागला तिथे मी सामान्य माणुस आहे. आज हा वनवास संपला असून, जनतेने स्वीकारल्या बद्दल गावकर्‍यांचे आभार मानत त्यांनी गावाच्या विकासासाठी कटीबध्द राहु अशी ग्वाही दिली.

यावेळी विठ्ठल महाराजांचे काल्याचे किर्तन झाले. यावेळी त्यांच्या समवेत बाळासाहेब अजबे काका, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे, विठ्ठल सानप, शिवाजी नाकाडे आदी उपस्थित होते.

COMMENTS