आज सत्तेत असलो तरी लोकसेवाच आपल्या डोक्यात आहे – धनंजय मुंडे

आज सत्तेत असलो तरी लोकसेवाच आपल्या डोक्यात आहे – धनंजय मुंडे

बीड – येथील बहुजन पत्रकार संघाकडून राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय मूकनायक पुरस्कार देण्यात आले. मूकनायक पाक्षिकाच्या शताब्दी निमित्त बीड येथील यशवंतराव नाट्यगृहात भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी त्यांनी पत्रकारांचे अभिनंदन करताना लोकशाहीत पत्रकारांच्या भूमिकेकडून अपेक्षा व्यक्त केल्या. विरोधी पक्षात काम करताना लोकसेवेसाठी प्रश्न मांडले आज सत्तेत असलो तरी लोकसेवाच आपल्या डोक्यात आहे असे सांगताना धनंजय मुंडे यांनी पत्रकारांनी कायम लोकांच्या मुक्या भावनांना आणि प्रश्नांना मांडले पाहिजे असे म्हटले .

यशवंत राव नाट्यगृह बीड येथील भव्य सोहळ्यात मूकनायक पुरस्कार देण्यात आले . आजही पत्रकारांची भूमिका आव्हानात्मक आहे , लोकांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर दाबण्याचे काम केले जात आहे अश्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाक्षिका प्रमाणे आवाज मांडला पाहिजे , ज्या पत्रकारांनी संघर्षात काम केले अश्या पत्रकारांचा सन्मान आपल्या हस्ते होत असल्याने आपणास आज कर्तव्यसमाधान असल्याचे त्यांनी म्हटले .

यावेळी व्यासपीठावर आ संदीप क्षीरसागर , चळवळ नेत्या सुशीला ताई मोराळे , उत्तम हजारे , वसंत मुंडे , दादासाहेब मुंडे ,अनिल जाधव , अनिल मगर , महेंद्र मुधोळकर ,सुधाकर सोनवणे , सुनील डोंगरे , आत्माराम व्हावळ ,आदींची उपस्थिती होती .

चंदन शिरवाळे यांना राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार देण्यात आला . तर भास्कर चोपडे यांना मरणोत्तर मूकनायक पुरस्कार देण्यात आला . रोख २५ हजार व स्मृती चिन्हअसा पुरस्कार देण्यात आला . यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रल्हाद लुलेकर , शिवाजीराव जाधव , सुधाकर कश्यप टीव्ही ९ यांचे व्याख्यान झाले . यावेळी संपादक शेख तय्यब , पृ भन्ते धम्मशील , व अनिता विजय डोंगरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

लोकपत्रकाराला मूकनायक

दैनिक लोकाशाचे वृत्त संपादक भागवत तावरे यांना मूकनायक पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले . दबावाला बळी न पडता त्यांनी सरकारच्या समोर प्रश्न मांडले , सातत्याने मुक्यांचा आवाज त्यांनी शब्दबद्ध केला असा उल्लेख करत धनंजय मुंडे यांनी त्यांचे व इतर पत्रकारांचे कौतुक केले.

COMMENTS