समृद्धी महामार्गाला नाव द्यायचंच असेल तर  राष्ट्रमाता जिजाऊंचे द्या, धनंजय मुंडेंची मागणी ! VIDEO

समृद्धी महामार्गाला नाव द्यायचंच असेल तर राष्ट्रमाता जिजाऊंचे द्या, धनंजय मुंडेंची मागणी ! VIDEO

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या नावावरून आता राजकारण तापलं अससल्याचं दिसत आहे.समृद्धी महामार्गाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली आहे. तुम्हाला जर समृद्धी महामार्गाला नाव द्यायचं असेल तर राष्ट्रमाता जिजाऊंचे द्या असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी या महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी भाजपाने केली होती. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला खूष करण्यासाठी सरकार समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याच्या विचारात होतं. परंतु आता धनंजय मुंडे यांनी बाळासाहेब अथवा वाजपेयी यांचं नाव न देता राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देण्याची मागणी केली आहे. मुंडेंच्या या मागणीमुळे आता  सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS