चेंबुरमधील सामाजिक न्याय भवन व एक हजार मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे बांधकाम सहा महिन्यात पूर्ण करा -धनंजय मुंडे

चेंबुरमधील सामाजिक न्याय भवन व एक हजार मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे बांधकाम सहा महिन्यात पूर्ण करा -धनंजय मुंडे

मुंबई – मुंबईतील चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन व एक हजार क्षमतेचे मुलांचे शासकीय वसतीगृहाचे बांधकाम विकासकाने सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

चेंबुर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन व एक हजार क्षमतेच्या मुलांचे शासकीय वसतीगृहाचे बांधकामाची आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी श्री. मुंडे बोलत होते.

श्री. मुंडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 250 क्षमता असलेले मुलींची वसतीगृह व 750 क्षमता असलेले मुलांचे वसतीगृह चेंबुर येथे प्रस्तावित आहे. हे वसतीगृह बांधा व हस्तांतरण करा (बीओटी) या तत्वावर खासगी विकासकाला देण्यात आले आहे. विकासकाने आतापर्यंत 10 टक्केच बांधकाम पूर्ण केलेले आहे. तथापि ही कामे पुढील सहा महिन्यात विकासकाने पूर्ण केली पाहिजेच अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन, खाजगी विकासक व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS