नाथरा या जन्मगावात, धनंजय मुंडेंचे जोरदार स्वागत,जुन्या आठवांणींना दिला उजाळा!

नाथरा या जन्मगावात, धनंजय मुंडेंचे जोरदार स्वागत,जुन्या आठवांणींना दिला उजाळा!

परळी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या जन्मगाव नाथरा येथे भेट दिली असता गावकऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. महिलांनी औक्षण करत साखर भरवून आपल्या कर्तबगार लेकाचे तोंड गोड केले. यावेळी ना. मुंडे यांनी नाथऱ्याचे ग्रामदैवत पापनाशेश्वराचे दर्शन घेतले; तसेच गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले ना. मुंडे आज नाथरा या आपल्या जन्मगावी आले होते. यावेळी नाथऱ्यातील लोकांसमवेत गप्पा मारण्यात व जुन्या आठवांणींना उजाळा देण्यात ते बराचवेळ रमले होते. लहानपणीच्या मित्रांसोबत गप्पा मारण्यात बराचवेळ रमलेल्या ना. मुंडेंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. यावेळी ना. मुंडेंनी ग्रामदैवत पापनाशेश्वराचे दर्शन घेतले तसेच गावातील मारुती चे ही दर्शन घेतले गावातील अनेक महिलांनी आपल्या कर्तबगार लेकाचे औक्षण करत साखर देऊन तोंड गोड केले ज्येष्ठ मंडळींनी ही आशीर्वाद दिले.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व त्यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे या दिग्गज नेतृत्वाची जन्मभूमी नाथरा या गावाने धनंजय मुंडे व त्यांच्या परिवाराला कायम प्रेम व राजकीय बळ दिलेले आहे, धनंजय मुंडेही नाथऱ्यातील गावकाऱ्यांवर कुटुंबाप्रमाणे प्रेम करतात हे आजच्या त्यांच्या गावभेटीवरून दिसुन आले. राज्याचे मंत्रिपद ही मोठी जबाबदारी असून त्यासाठी गावकऱ्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी मोलाचे आहेत. इथल्या माऊल्यांनी साखरेने माझे तोंड गोड केले, यांच्या भल्यासाठी मला काम करायचे आहे अशा शब्दात ना. मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्यासमवेत जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, डॉ.संतोष मुंडे, अभय मुंडे, सचिन मुंडे, रामेश्वर मुंडे, सुरेश मुंडे, अतुल मुंडे, बाळु मुंडे, प्रताप मुंडे, उत्तम मुंडे, नितीन कोपरे, विनोद कांबळे, शेख ईसामुद्दीन, संपत मुंडे, सद्दाम मुंडे, नागनाथ मुंडे, राहूल मुंडे, केदार मुंडे, गोविंद मुंडे, विष्णु मुंडे, महादेव मुंडे, सुभाषराव मुंडे, माधवराव मुंडे, रत्नाकर मुंडे, अतुल मुंडे, श्रीहरी मुंडे,, शिवाजी मुंडे, आत्माराम मुंडे, ज्येष्ठ नागरिक अंबादास मुंडे, केशव मुंडे, सोपान मुंडे, माधव मुंडे, रामराव मुंडे, बबलु मुंडे, ज्ञानोबा मुंडे, एकनाथ मुंडे, सुर्यकांत मुंडे, शेख बशीर, शेख दगडू, दिलीप मुंडे, वचिष्ठ मुंडे, बाबासाहेब किरवले, सुनिल किरवले, दशरथ किरवले, शिवाजी उपाडे, सोमनाथ उपाडे, संभाजी सुर्यवंशी, मदन उपाडे, शेख नसीर, देविदास सातपुते आदि उपस्थित होते.

COMMENTS