सिंचनाचे 78 प्रकल्प पूर्ण करून बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसून काढु – धनंजय मुंडे

सिंचनाचे 78 प्रकल्प पूर्ण करून बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसून काढु – धनंजय मुंडे

बीड, परळी वैजनाथ – ऊसतोड मजुरांचा जिल्हा, मागासलेला जिल्हा अशी बीडची झालेली ओळख आणि लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी बीड जिल्ह्यातील मंजुर 78 सिंचनाचे प्रकल्प पुर्ण करण्याचे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे. तर जातीयवादी भाजपाला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे परभणीचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले. परळी तालुक्यातील सिरसाळा व पौळ पिंप्री येथे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सिरसाळा येथील या सभेस काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे, ज्येष्ठ नेते एम.टी.नाना देशमुख, संजय दौंड, निर्मळ अण्णा, युवक नेते अजय मुंडे, मोहनराव सोळंके, विजय मुंडे, लक्ष्मणराव पौळ, सुर्यकांत मुंडे, आश्विनीताई किरवले, माऊली गडदे, भाऊसाहेब नायबळ, सुर्यभान नाना मुंडे, माणिकभाऊ फड, प्रदिप मुंडे, भाग्यश्रीताई संजय जाधव, विष्णुपंत देशमुख, भागवतबप्पा देशमुख, प्रभाकरराव पौळ, डॉ.संतोष मुंडे, जानिमियाँ कुरेशी, इम्रान पठाण, देवराव काळे, संतोष पांडे, बालासाहेब किरवले, राजाभाऊ पौळ, चंद्रकांत कराड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, आघाडीचे सरकार असतांना बीड जिल्ह्यासाठी 78 प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवुन दिले होते. केंद्रात, राज्यात सत्ता असतांना हे 78 प्रकल्प भाजपाच्या खासदार आणि पालकमंत्र्यांना पुर्ण करता आले नाहीत. हे प्रकल्प पुर्ण झाले असते तर बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक मिटला असता, हे काम आता आम्हीच करू त्यासाठी बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जातीयवादी भाजपला धडा शिकवा

या सभेत बोलतांना आ.बाबाजानी दुर्राणी यांनी भारतीय जनता पार्टी हा जातीयवादी पक्ष आहे. आज अनेक समाज त्यामुळे भयग्रस्त वातावरणात राहत आहेत. आपल्याला भयमुक्त वातावरणात राहायचे असेल तर आघाडीच्या उमेदवारांना निवडुन दिल्याशिवाय पर्याय नाही. 2014 साली झालेली चूक पुन्हा न करता बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

परळीला काय मिळाले – प्रा.टि.पी.मुंडे

सत्ता असतांनाही परळीला काहीच मिळु शकले नाही, याचे अतिशय वाईट वाटते असे म्हणत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे यांनी भाजपला आता कायमचे सत्तेपासुन दुर लोटण्याचे आवाहन केले.

COMMENTS