शासनाच्या विभागांनी जनतेसाठी गुणवत्ता पूर्ण कामावर भर द्यावा – पालकमंत्री धनंजय मुंडे

शासनाच्या विभागांनी जनतेसाठी गुणवत्ता पूर्ण कामावर भर द्यावा – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड – शासनाच्या विविध विभागांनी जनतेसाठी योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होईल याकडे लक्ष देतानाच शासकीय अधिकाऱ्यांनी गुणवत्ता पूर्ण कामावर भर द्यावा असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.परळी विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांच्या संबंधित आढावा बैठक राज्याचे समाज कल्याण व विशेष सहाय्य मंत्री कथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या शिरसाठ आमदार संजय दौंड उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई श्रीमती शोभा जाधव यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले नागरिकांच्या सोयीसाठी लागू करण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा अंमलबजावणी करताना लवकरात लवकर कार्यवाही करावी लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करायला लागू नये याची काळजी घेतली जावी विशेषता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात येणारे दर महिन्याचे अन्नधान्य वितरण व्यवस्थित होईल यासाठी दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असे पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले.

याप्रसंगी अंबाजोगाई व परळी तहसीलदारांनी शिधापत्रिकांचे ऑनलाईन काम तसेच संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना शेतकरी आत्महत्या मदतीचे प्रस्ताव या अनुषंगाने माहिती सादर केली. मंत्री महोदय म्हणाले शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांची व इतर काही प्रश्न आहेत याची सोडवणूक करण्याकरिता शासन पातळीवरून दखल घेण्यात येत असून त्यामुळे आवश्यक उपाययोजना केल्या जातील परंतु सद्यस्थितीत देखील कामाचा व्याप लक्षात घेता आहेत या स्थितीमध्ये चांगले काम करून नागरिकांना आवश्यक त्या सुविधा व लाभ दिले जावेत असे पालकमंत्री धनंजय मुंडे सांगितले.

यावेळी महसूलसह आरोग्य, शिक्षण, कृषी, सार्वजनिक बांधकाम , रेल्वे , औष्णिक वीज निर्मिती केंद्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलसंपदा , महावितरण, वने, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, पंचायत समिती परळी व अंबाजोगाई आधी विभागांचा सखोल आढावा घेण्यात आला.

यावेळी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये चांगले काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्रीमहोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तब्बल चार तास ही बैठक केंद्राच्या विश्रामगृहावर संपन्न झाली.

COMMENTS