भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षांचं उपोषण राष्ट्रवादीच्या नेत्यानं सोडलं !

भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षांचं उपोषण राष्ट्रवादीच्या नेत्यानं सोडलं !

बीड  –  राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी होत आमदार झालेले सुरेश धस यांच्याविरोधात भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश शिंदे यांनी सहा दिवस आमरण उपोषण केले. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले मात्र त्यांच्याकडे पंकजा मुंडे किंवा भाजपच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याने ढुंकूनही पाहिले नाही. त्याच भाजपच्या कार्यकर्त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे रात्री बारा वाजता आले आणि त्यांनी उपोषण सोडवलं आहे.

भाजयुमोचे आष्टी तालुकाध्यक्ष सतीश शिंदे यांनी सहा दिवसापासून सुरेश धस यांच्या विरोधात पोलीस तक्रार करीत उपोषण सुरू केले होत. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आपल्या उपोषणाची कोणीच दखल घेत नाही. पालकमंत्री यांनी तर विचारले सुद्धा नाही ही सल त्यांच्या मनात होती.

दरम्यान धनंजय मुंडे हे बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी सतीश शिंदे यांची भेट घेतली,त्यांच्या विनंतीवरून शिंदे यांनी आपले उपोषण मागे घेतले. उपोषणाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात दुष्मन का दुष्मन अपना दोस्त अशी समीकरणे जुळू लागल्याचे चित्र दिसत आहे.

 

COMMENTS