धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा पहिला विजय !

धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा पहिला विजय !

परळी वै. – राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपला पहिला विजय बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नोंदवला तर दुसराही परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी ही भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. परळीचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायत व परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुक जिंकली आहे.

आज मतमोजणी नंतर गावातून भव्य मिरवणूक काढून विजयी सरपंच सदस्यांनी जल्लोष साजरा केला. धनंजय मुंडे यांनी नूतन सरपंच आश्रुबाई किरवले व प्रकाश चाटे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी अंबाजोगाई पंचायत समितीचे सभापती शिवहर भताने गुरुजी, युवक नेते बालासाहेब कातकडे, लिबराज लहाने यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. या विजयासाठी तिन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS