बीडमधील घटना दुर्दैवी, शांतता व सलोखा राखण्याचे धनंजय मुंडेंचे आवाहन !

बीडमधील घटना दुर्दैवी, शांतता व सलोखा राखण्याचे धनंजय मुंडेंचे आवाहन !

नागपूर – बीड शहरामध्ये आज एनआरसी बिल आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात बंद पुकारण्यात आला होता, या बंद दरम्यान दगडफेकीची घडलेली घटना दुर्दैवी असून जिल्हा वासीयांनी शांतता व सलोखा अबाधित राखण्याचे आवाहन आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दुपारपर्यंत शांततेत पार पडलेल्या या आंदोलनाला दुपारनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आल्यानंतर थोडेसे हिंसक वळण लागले,घटनास्थळी दंगल नियंत्रक पथकाचे कर्मचारी वेढा टाकून आहेत. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरी बीड शहरात परिस्थिती तणावपूर्ण आहे.

दरम्यान जिल्हावासीयांना शांततेचे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी शासन निर्णयाविरुद्ध आपले मत मांडणे किंवा निषेध करणे हा आपला अधिकार आहे, परंतु तो महात्मा गांधीनी दाखवलेल्या शांततेच्या मार्गाने असावा. सामाजिक ऐक्य जपून सृजनशील समाज घडविण्यासाठी शांतता व संयम राखावा तसेच कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

COMMENTS