जातीयवादी भाजपापासून अल्पसंख्यांक समाजाने सावध रहावे- धनंजय मुंडे

जातीयवादी भाजपापासून अल्पसंख्यांक समाजाने सावध रहावे- धनंजय मुंडे

परळी – फोडा आणि राज्य करा या उक्तीप्रमाणे जातीयवादी पक्ष असणार्‍या भाजपाने अल्पसंख्यांक समाजात फुट पाडण्याची कुटनीती अवलंबीली आहे. त्यामुळे आपल्या समाजाच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर जातीयवादी भाजपापासून सावध राहण्याची गरज असून, त्यासाठी पुरोगामी विचारांच्या पक्षांना साथ द्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

परळी शहरातील बागवान समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. या समाजाच्याच नव्हे तर परळी शहराच्या प्रत्येक लहान-मोठ्या समस्या असो की, सार्वजनिक प्रश्न ते सोडवण्यासाठी मी नेहमीच जीव तोडून काम केले आहे. स्वतःसाठी पहिल्यांदाच मतदान मागत असलो तरी हे मतदान माझ्यासाठी नव्हे तर परळीच्या विकासासाठी आणि तुमच्या कल्याणासाठी आहे. अल्पसंख्यांक समाजातील अपक्ष उमेदवार उभे करणे, भाजपाला छुपा पाठींबा देणार्‍या पक्षांना बळ देणे असे उद्योग भाजपाकडून केले जात आहेत. यात भविष्यात समाजाचेच नुकसान होणार आहे, माझा हा लढा स्वतःसाठी नव्हे तर तुमच्यासाठी आहे, त्याला साथ देवून आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस बागवान समाज अध्यक्ष मस्जिद बागवान, हकीम बागवान, अब्दुल रौफ बागवान, अब्दुल रज्जाक बागवान, खाजा बागवान, अयुब बागवान, रशिद बागवान, जावेद बागवान, अजिम बागवान, अश्फाक बागवान, हय्या बागवान, मोईन बागवान, असिफ बागवान, सोफियान बागवान, आरेफ बागवान, इसाक बागवान, रेहान बागवान, अब्दुल हमीद बागवान, लियाज बागवान, मोसीन बागवान, वाजीद बागवान, फारूख बागवान, कलिम बागवान, एजाज बागवान, सद्दाम बागवान, वसीम बागवान, जुनेद बागवान, अलिम बागवान, शोएब बागवान, जुबेर बागवान, जुनेद बागवान, फिरोज बागवान व समाजबांधव उपस्थित होते.

COMMENTS