राष्ट्रवादीत हालचालींना वेग, दिग्गज नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया!

राष्ट्रवादीत हालचालींना वेग, दिग्गज नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया!

मुंबई – राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला असून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पक्षाचे दिग्गज नेते दाखल झाले होते. या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे हे उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती अजून मिळाली नाही परंतु या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी मुंडे यांनी भाजपवर टूका केली असून आज मी, सुनील तटकरे, आदिती तटकरे एकत्र आलो हा योगायोग नाही. पण देवेंद्र फडणवीस यांची सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि बिहारचे निवडणूक प्रभारी होणं हा योगायोग आहे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी आम्ही आज बैठकीत शरद पवार यांच्याशी पार्थ पवार यांच्या विषयी कोणतीही चर्चा केली नाही,’ असं म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू आणि पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्यावर आक्रमक शब्दांमध्ये टीका केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांची भेट घेतली आहे.

COMMENTS