त्यामुळे विरोधकांना मजा वाटली परंतु आम्ही निबार आहोत – धनंजय मुंडे

त्यामुळे विरोधकांना मजा वाटली परंतु आम्ही निबार आहोत – धनंजय मुंडे

कोल्हापूर – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटलं अशा बातम्या सुरु होत्या. वातावरणात बदल झाल्यामुळे सभेच्या ठिकाणी यायला वेळ झाला. आमचा संपर्क मी हेलिकॉप्टरमध्ये असल्यामुळे होत नव्हता त्यामुळे विरोधकांना मजा वाटली होती परंतु आम्ही एवढे निबार आहोत की तुम्हाला या राज्याच्या सत्तेतून घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. मुदाळच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

दरम्यान दिवसाढवळ्या या मोदी सरकारने आपल्याला लुटले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तन यात्रा काढली आहे. याला साथ द्या परिवर्तन नक्कीच होईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच मी पुराव्यानिशी १६ मंत्र्यांच्या ९० हजार कोटीचे भ्रष्टाचार बाहेर काढले. मग हा कोणता भ्रष्टाचार आहे असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

पाच मंत्रीपदासाठी स्वाभिमानी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज लाचार झाली आहे असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. लोकसभेत आणि महाराष्ट्रातही परिवर्तन होणार हे नक्की आहे. त्यामुळे या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक,आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदींसह मुदाळ येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS