राष्ट्रवादीत असताना भाजपसाठी ‘बबन्या’ होते, आता बबनराव कसे झाले ? – धनंजय मुंडे

राष्ट्रवादीत असताना भाजपसाठी ‘बबन्या’ होते, आता बबनराव कसे झाले ? – धनंजय मुंडे

मुंबई – राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव पाचपुते राष्ट्रवादीत असताना भाजपसाठी ‘बबन्या’ होते. मात्र भाजपप्रवेश होताच ते बबनराव कसे झाले. असा टोला मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. आज जिंतूर येथे असलेल्या याच यात्रेतून मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

दरम्यान बबनराव पाचपुते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचारी असल्याचे आरोप केले होत्. त्यावेळी ते तुमच्यासाठी ‘बबन्या’ होते. मात्र भाजपमध्ये येताच ते बबनराव झाले. तसेच मुख्यमंत्री यांच्या या भूमिकेमुळे, त्यावेळी झालेले आरोप फक्त राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्यासाठी होते. नाहीतर भाजप पक्षात भ्रष्टाचारी आहे हे फडणवीस यांनी मान्य करायले हवेत असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS