नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही – धनंजय मुंडे

नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही – धनंजय मुंडे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाचाळवीरपणा वाढत आहे. हाफ चड्डीची फुल पँट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नसल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.ते मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील सभेत बोलत होते.

दरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना संघाच्या चड्डीचा उल्लेख केला होता. यावर पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, २३ तारखेला कोणाची चड्डी निघाली हे जनता बघेल. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला आहे.  २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. निवडणुकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नसल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS