पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्र्यांची दुष्काळ जाहीर करण्याची पध्दत सारखीच -धनंजय मुंडे

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्र्यांची दुष्काळ जाहीर करण्याची पध्दत सारखीच -धनंजय मुंडे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सॅटेलाईटमुळे काही तालुके दुष्काळातुन वगळले हे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य अतिशय धक्कादायक आणि तितकेच खरे आणि गंभीर आहे. कारण मोदी काय किंवा फडणवीस काय यांची दुष्काळ जाहिर करण्याची पध्दत शेतकरी विरोधी व विमा कंपन्यांच्या फायद्याची असल्यानेच लाखो शेतकरी वंचित राहिले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केला आहे.

जालना जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलतांना मंत्री लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सॅटेलाईटमुळेच काही तालुके दुष्काळाच्या यादीतुन वगळले असल्याचे वक्तव्य केले. मोदींची सॅटेलाईट सेवा दुष्काळ कसा तपासते आणि त्यामुळे आपल्याकडील काही तालुके कसे वगळले जातात हे त्यांनी उदाहरणासह समजुन सांगताना या तालुक्यांना आता केंद्राकडुन मदत मिळण्याचा पर्यायाने शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळणार नसल्याचे जाहिररित्या मान्य करून टाकले आहे.

लोणीकर यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना म्हटले आहे  धनंजय मुंडे यांनी लोणीकर बोलले ते अगदी खरे आहे. या सरकारचे दुष्काळ मोजण्याचे गणित आर्यभट्ट यांनाही समजणार नाही. कारण कमीत कमी दुष्काळ दाखवुन विमा कंपन्यांना कोट्यावधी रूपयांचा फायदा मिळवुन द्यायचा आणि शेतकर्‍यांना देशाधडीला लावायचे अशी सरकारची नियत आहे. जानेवारी 2018 पासुन मी दुष्काळाबाबतचे सन 2016 चे निकष बदलण्याचे व दुष्काळ जाहिर करण्याची नविन संहिता सदोष असल्यानेच ती रद्द करणे बाबतची मागणी सातत्याने करीत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली नाही. ती दखल घेतली असती तर दुष्काळ असुनही दुष्काळी लाभा पासुन वंचित राहण्याची वेळ राज्यातल्या लाखो शेतकर्‍यांवर आली नसती आणि फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना अशा पध्दतीने जाहिर कबुली देण्याची वेळ आली नसती असे ही मुंडे म्हणाले.

COMMENTS