लहानपणापासून जयसिंगराव गायकवाड यांच्या कौटुंबिक संपर्कात, त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो -धनंजय मुंडे

लहानपणापासून जयसिंगराव गायकवाड यांच्या कौटुंबिक संपर्कात, त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो -धनंजय मुंडे

मुंबई – भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात बळकटी मिळेल पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम जोमाने चालते त्याचप्रमाणे जयसिंगराव काकांच्या मदतीने मराठवाड्यातही काम करू असे मत राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते उपस्थित होते; यावेळी मुंडे बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी मा. खा. जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्या आपण लहानपणापासून कौटुंबिक संपर्कात असून, त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेलो असल्याचे म्हटले. तसेच जयसिंगराव गायकवाड यांच्या संसदेतील व मराठवाड्यातील विविध प्रश्नांच्या बारीक अभ्यासाचा पक्षाला फायदा होईल असेही म्हटले, तसेच पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.

COMMENTS