म्हणूनच जयदत्त क्षीरसागरांनी आजच पक्षप्रवेश उरकून घेतला – धनंजय मुंडे

म्हणूनच जयदत्त क्षीरसागरांनी आजच पक्षप्रवेश उरकून घेतला – धनंजय मुंडे

मुंबई – राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि गेली काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन जयदत्त क्षीरसागर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धनंजय मुंडे
यांनी टीका केली आहे. बरे झाले जयदत्त क्षीरसागरांनी पक्ष बदलण्यासाठी आजचाच मुहूर्त निवडला, कारण उद्याच्या निकालामध्ये बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी लीड मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना कोणत्याच पक्षाने प्रवेश दिला नसता. म्हणूनच त्यांनी आजच पक्षप्रवेश उरकून घेतला असावा असा चिमटा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काढला आहे.

 

COMMENTS