आमदार होण्यासाठी ‘वर्षा’वरील नाही तर राजुरीच्या गणपतीचा आशिर्वाद हवा, धनंजय मुंडेंचा टोला !

आमदार होण्यासाठी ‘वर्षा’वरील नाही तर राजुरीच्या गणपतीचा आशिर्वाद हवा, धनंजय मुंडेंचा टोला !

बीड – विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना टोला लगावला आहे. बीडचा आमदार व्हायचं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरील नाही तर राजुरीच्या गणपतीचा आशिर्वाद हवा असा टोला धनंजय मुंडे यांनी नाव न घेतला क्षीरसागर यांना लगावला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील गणतीचं दर्शन घेतलं होतं. त्यावरुन मुंडे यांनी हा टोला लगावला आहे.

दरम्यान राजुरी येथे गणपतीचे मंदिर असून ते जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे राजुरी हे जयदत्त क्षीरसागर यांचं मूळ गाव आहे. त्यामुळे मुंडे यांनी क्षीरसाग यांना हा टोला लगावला आहे. आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा 10 दिवस आशीर्वाद घेतला, त्यापेक्षा राजुरीचा आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS