‘त्या’ पुस्तकावरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा ! VIDEO

‘त्या’ पुस्तकावरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा ! VIDEO

मुंबई – महाराष्ट्रासह सबंध देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, अशा शब्दात महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली आहे.

दिल्ली येथील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने विरोधकांसह देशभरातून शिवप्रेमींनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून भाजपावर टीकेची झोड उठवली जात आहे. सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

या विषयावरून मोठा वाद उभा राहिला असून धनंजय मुंडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कुणीही करू शकत नाही, असा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही असा सूचक इशारा दिला आहे.

COMMENTS