परळीत ‘त्या’ गुंडांची पोलीस प्रशासन धिंड काढणार  – धनंजय मुंडे VIDEO

परळीत ‘त्या’ गुंडांची पोलीस प्रशासन धिंड काढणार – धनंजय मुंडे VIDEO

बीड – परळी येथील व्यापारी व अन्य काही जणांमध्ये आपसात झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्यानंतर संबंधित आरोपींवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा घटनेटमध्ये मी कोणाचीही गय करणार नाही असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

परळी येथील टॉवर चौक परिसरात काल (दि. १७) रोजी दोन गटात प्रॉपर्टीच्या वादातून भांडण झाले होते, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यांनतर भांडणातील आरोपी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, त्यांनतर मुंडेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच या गुंडांनी पुन्हा अशाप्रकारचं कृत्य करु नये यासाठी पोलीस प्रशासन परळी येथील टॉवर चौक ते पोलीस ठाणे अशी गुंडांची धिंड काढणार असल्याचंही मुंडे म्हणालेत.

COMMENTS