मुंडे साहेब आणि माझ्या नात्यानुसार पाथर्डी माझी आजी आहे – धनंजय मुंडे

मुंडे साहेब आणि माझ्या नात्यानुसार पाथर्डी माझी आजी आहे – धनंजय मुंडे

पाथर्डी – स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब पाथर्डीला मावशी म्हणायचे. मुंडे साहेब आणि माझ्या नात्यानुसार पाथर्डी ही माझी आजी आहे. मुंडे साहेबांनी जेवढा जीव या पाथर्डीला लावला त्याहून तसूभरही प्रेम कमी पडू देणार नाही. एकेकाळी खलनायक ठरवलेल्या या धनंजय मुंडेला तुम्ही आज कवेत घेतलं त्याबद्दल आभार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. पाथर्डी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

दरम्यान स्व. मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड मजूरांसाठीचे महामंडळ निर्माण करण्याचे सरकारने जाहीर केले. ते रद्द का केले गेले? आपल्या लोकनेत्याचा पदोपदी झालेला अपमान का सहन करायचा? सरकारचा प्रत्येक निर्णय सामान्यांचा अपमान करणारा आहे. या अपमानाचा बदला घेण्यासाठीच ही परिवर्तनाची यात्रा काढली असल्याचंही यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS