मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, फक्त एकच इच्छा आहे – धनंजय मुंडे

मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, फक्त एकच इच्छा आहे – धनंजय मुंडे

बीड – मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत आहे. फक्त एकच इच्छा आहे, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या तुम्हाला शुभेच्छा असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान परळीतील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परळीत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींच्या स्वागतासाठी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत. एकच इच्छा आहे, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल, असं म्हटलं आहे.

दरम्यान मोदींच्या परळी दौय्रावरुन धनंजय मुंडे यांना दोन दिवसांपूर्वीच जोरदार टीका केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. तेच काय पण भाजपाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आणले, तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS