संसार चालवण्याचा अनुभव नाही, देश कसा चालवणार – धनंजय मुंडे

संसार चालवण्याचा अनुभव नाही, देश कसा चालवणार – धनंजय मुंडे

सांगली – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आश्वासन पूर्ण करण्यासाठी अनुभव लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देश चालवण्याचा अनुभव नाही. आयुष्यात त्यांनी कधी घरातला किराणा तरी आणला आहे का, व्यवहार केला आहे का, यांना संसार चालवण्याचा अनुभवच नाही तर सरकार कसं चालवणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. शिराळा येथील हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते.

दरम्यान अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी आंदोलन केलं. तत्कालीन केंद्र सरकारविरोधात जनता नाराज होती. याचा फायदा भाजपाने घेतला. भाजपाने मोदी यांना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले. गुजरात मॉडेल प्रोजेक्ट केले. पण मोठी आश्वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. जनता जागरूक राहिली तर लोक देशाच्या चौकीदाराची पुन्हा नेमणूक करणार नाहीत. जनतेत इतका रोष आहे की, आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना २०१९ नंतर कोणी ओळखणारही नसल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS