धनंजय मुंडेंचा खड्ड्यासोबत सेल्फी, “हजारो कोटी नेमके कुणाच्या खिशात गेले ?”

धनंजय मुंडेंचा खड्ड्यासोबत सेल्फी, “हजारो कोटी नेमके कुणाच्या खिशात गेले ?”

परभणी – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज गंगाखेड-परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्यांसोबत सेल्फी काढला आहे. या खड्ड्यांसोबत काढलेला सेल्फी धनंजय मुंडे यांनी ट्वीट करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना त्यांनी गंगाखेड-परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्यांसोबत सेल्फी काढत चंद्रकांत दादा, हे पहा रस्त्यांवरील खड्डे असे म्हणत ट्विट केले आहे.

दरम्यान सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आता खड्ड्यांची देखील दखल घेईल. त्याचबरोबर मागील चार वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रूपये नेमके कुणाच्या खिशात गेले? अशी खरमरीत टीका देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे.

COMMENTS