‘हेतर’ महाराष्ट्रातील निरव मोदी – धनंजय मुंडे

‘हेतर’ महाराष्ट्रातील निरव मोदी – धनंजय मुंडे

मुंबई – विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी  गंगाखेड येथील शुगर फॅक्टरी असलेल्या रत्नाकर गुट्टे प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला . यावेळी मुंडे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली असून महाराष्ट्राला निरव मोदी आपण आहोत हे गुट्टे यांनी दाखवून दिले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.तसचे 23 बनावट कंपन्या तयार करून शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेतले. यामध्ये गुट्टे यांनी शेतकरी आणि बँकांना 5 हजार 500 कोटी रुपयांना फसवले असल्याचं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी डीएसकेंच्या अटकेबाबतचा मुद्दाही मांडला. एकीकडे डीएसके यांच्यावर कारवाई होऊन अटक झाली. याठिकाणी गुंतवणूकदारांनी सहमतीने पैसे गुंतवले होते. तरीही तिथे पोलीस लगेच कारवाई करतात. मात्र इथे 25,000 शेतकरी आहेत. इथे मात्र गुन्हा नोंदवला असून सुद्धा कारवाई केली जात नसल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी सभापतींनी ही मोडस ऑपरेंडी वेगळी आहे. जर कोर्टाने SIT नेमली नसेल तर शासनाने 6-7 महिन्याच्या कालावधीत SIT नेमत कारवाई पूर्ण करावी असे निर्देश दिले आहेत.

COMMENTS