लोकसभेतील पराभवानंतर धनंजय मुंडे कार्यकर्त्यांना म्हणतात…

लोकसभेतील पराभवानंतर धनंजय मुंडे कार्यकर्त्यांना म्हणतात…

मुंबई – लोकसभा निवडणुकीत पन्हा एकदा भाजपला मोठं यश मिळालं आहे. या निवडणुकीत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास राष्टेरवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला होता. परंतु याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा मोठा पराभव झाला आहे. या पराभवानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई, देखो और सुधार करो… असं म्हणत त्यांनी आत्मचिंतन करायला लागणार असल्याचं सुचित केलं.

जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढाईचे मैदान सोडू नका… असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना आधार दिला आहे.

COMMENTS