रोहा, गोरेगाव व तळा जिल्हा रायगड येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम तत्काळ सुरु करण्याचे निर्देश – धनंजय मुंडे

रोहा, गोरेगाव व तळा जिल्हा रायगड येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम तत्काळ सुरु करण्याचे निर्देश – धनंजय मुंडे

मुंबई – रायगड जिल्ह्यातील रोहा, गोरेगाव व तळा येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम तत्काळ सुरु करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.रायगड जिल्ह्यातील रोहा, गोरेगाव व तळा येथील सामाजिक सभागृहाचे बांधकामासंबंधी आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती, त्यावेळी मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेल्या जिल्ह्यातील तळा, रोहा व गोरेगाव येथे सामाजिक सभागृहाला 2018 मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु अद्यापही काम सुरु झाले नाही. या संबंधीच्या अडचणी दूर करुन पुढील 15 दिवसात तत्काळ सभागृहाचे बांधकाम सुरु करण्यात येईल.

यावेळी माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS