पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय – धनंजय मुंडे

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय – धनंजय मुंडे

मुंबई – पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय…अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आमजार आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणार्‍या भाजपाच्या आशिष शेलार यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरातील वक्तव्यावर भाजपाचे आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर राजकीय पटलावर जोरदार ट्विटर युद्ध सुरू झाले असून राष्ट्रवादीकडून आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू…आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येतं? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार! असं ट्वीट शेलार यांनी केलं होतं.

COMMENTS