सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार – धनंजय मुंडे

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार – धनंजय मुंडे

मुंबई – सुरुवात तुम्ही केली आहे मात्र याचा शेवट विरोधी पक्ष करणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. विधिमंडळात दलाली सुरु असलेला आरोप माझ्यावर करण्यात आला असून सभागृहाने या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरू झाले आहे. याची सुरुवात कोणीही केली असेल पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच न्यूज १८ या वृत्तवाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. त्यामुळे न्यूज १८ लोकमत वाहिनीवर हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.

दरम्यान आता यापुढे मी रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची क्लिप काढणार असून या प्रकरणाच्या खोलाशी मी गेलो आहे. मी बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण कोणाला भेटली हे सर्व मला माहिती आहे असंही मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच ही लक्षवेधी सूचना २०१६ मधील आहे. जर मी पैसे घेतले असतील तर २०१७मध्ये याच लक्षवेधीबाबत तारांकीत प्रश्न कसा उपस्थित झाला असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मीच जिंकलो

सत्ताधाऱ्यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला पण मी आज जिंकलो आहे. मी ज्या पद्धतीने सरकारविरोधात आवाज उठवत आहे ते सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. एवढ्या क्षुल्लक कारणावरून आज मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. जर माझ्यावरील आरोप खरच खरे असते तर तुम्ही मला आज जेलमध्ये टाकले असते असंही मुंडे म्हणाले आहेत.

COMMENTS