ब्रेकिंग न्यूज – परळीत धनंजय मुंडे 9840  मतांनी आघीडवर !

ब्रेकिंग न्यूज – परळीत धनंजय मुंडे 9840 मतांनी आघीडवर !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीनंतर निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु मतमोजणीदरम्यान काही दिग्गज नेते आघाडीवर आहेत. तर काही पिछाडीवर आहेत. पिछाडीवरील नेते मागेच राहिले तर त्यांची हार होऊ शकते. महाराष्ट्रात 288 जागांपैकी काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी, बारामती, सातारा, वरळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

परळी मतदारसंघात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

बीडमधील परळी मतदारसंघात भाजपच्या
पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यात चुरशीची लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे. सध्या मतमोजणी सुरु असून आतापर्यंतच्या अपडेट माहितीनुसार परळीत भाजपच्या पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत. 9 व्या फेरी अखेर धनंजय मुंडे 9840 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे ते असेच आघाडीवर राहिले तर पंकजा मुंडे यांच्या चिंतेत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या होत्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे त्या पुन्हा विजयी होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS