राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय, पराभवानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया!

राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय, पराभवानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीनंतर निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु मतमोजणीदरम्यान काही काही मतदारसंघातील निकाल हाती आले आहेत. बीडमधील परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा विजय झाला आहे. 17 व्या फेरीत धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर राहिले आहेत. या पराभवानंतर पकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून जनतेचा कौल मला मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दोन बहीण भावांच्या या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यातच मतदानाच्या दोन दिवस आधी, धनंजय मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यावरून मोठा राजकीय वाद उफाळून आला होता. त्यामुळे ही निवडणूक आणखीनच लक्षवेधी ठरली होती. परंतु या भावनिक राजकारणावर मात करत धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे.

परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या होत्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु यावेळी मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर मात करत दणदणीत विजय मिळवला आहे.

COMMENTS