शासकीय कामासाठी मुंबईला चकरा मारण्याची गरज नाही, धनंजय मुंडेंचा परळीतच जनता दरबार !

शासकीय कामासाठी मुंबईला चकरा मारण्याची गरज नाही, धनंजय मुंडेंचा परळीतच जनता दरबार !

परळी – परळी मतदार संघातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. विविध विभागातील शासकीय कामांसाठी मुंबईला येणाऱ्या परळीकरांचा वेळ, शक्ती आणि पैसा वाचावा, त्यांना मुंबईला चकरा मारण्याऐवजी परळीतुनच त्यांचे काम मार्गी लावता यावे व यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करण्याचा माणस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

आज (दि.१०) परळी येथील विश्रामगृहात परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी खास जनता दरबाराचा दुसरा दिवस होता. हजारावर निवेदने, मागण्या, अडचणी, समस्या घेऊन आजही परळी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांची गर्दी आणि शेवटच्या माणसाचे समाधान होईपर्यंत मुंडेंचा प्रतिसाद या समीकरणाने जनता दरबाराचा दुसरा दिवसही हाऊसफुल ठरला!

काही वैयक्तिक कामाच्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी किंवा तत्सम मागण्या ना. मुंडे हे जागच्या जागीच सोडवतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आजही अनेक विषयी संबंधितांना फोनवर सूचना देऊन किंवा पत्र देऊन असे अनेक विषय ना. मुंडेंनी जागच्या जागी सोडवल्याने गर्दीतून वाट काढत भेटायला गेलेल्या सामान्य परळी करांच्या चेहऱ्यांवर बाहेर येताना समाधान दिसत होते!

दरम्यान मंत्रालयातील विविध विभागांमध्ये आपली गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. दररोज अनेक नागरिक आपल्या मागण्या-अडचणी, निवेदने घेऊन मुंबईच्या चकरा मारत असतात. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो त्यामुळे अशा सर्व नागरिकांच्या मंत्रालयातील कामांचे व्यवस्थापन परळीतूनच करता येईल व सामान्यांना मुंबईच्या वाऱ्या करायची गरज पडणार नाही अशी व्यवस्था आपण विकसित करू असे यावेळी मुंडे म्हणाले.

COMMENTS