बीड – सरकारविरोधात धनंजय मुंडेंनी परळीत काढली पायी रॅली ! VIDEO

बीड – सरकारविरोधात धनंजय मुंडेंनी परळीत काढली पायी रॅली ! VIDEO

बीड – काँग्रेस आणि विरोधकांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंद मोर्चात राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक पक्षांनी मोठा सहभाग घेतला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीत सरकारच्या विरोधात रनशिंग फुंकले. मुंडे यानी परळी शहरात पायी रॅली काढली. त्यांच्यासोबत शिवसेना वगळता सर्वच पक्ष संघटनांची उपस्थिती होती. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर परळी शहरवासीयांनी कडकडीत बंद पाळून बंदला उस्फुर्त पाठिंबा दिला. दरम्यान सध्याची लाट भाजपाविरोधी असुन येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत मोठे परिवर्तन होणार असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय.

२०१४ च्या निवडणूकापूर्वी महागाईचाच विषय घेवून निवडून आलेल्या या सरकारला आता जाण राहिली नसल्याचे सांगत भाजप- शिवसेनेविरूध्द बंद पुकारण्याऐवजी आता येणाऱ्या निवडणूकीत भाजप शिवसेनेलाच हद्दपार करा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS