भारतातील खरी ‘तुकडे तुकडे गँग’ आणि त्यांच्या प्रमुखाला जगासमोर आणण्यासाठी टाईमचे आभार – धनंजय मुंडे

भारतातील खरी ‘तुकडे तुकडे गँग’ आणि त्यांच्या प्रमुखाला जगासमोर आणण्यासाठी टाईमचे आभार – धनंजय मुंडे

मुंबई – टाईम मॅगझीनने वेळोवेळी ‘व्हीलन नंबर १’ चा खरा चेहरा समोर आणला आहे. भारतातील खरी ‘तुकडे तुकडे गँग’ आणि त्यांच्या प्रमुखाला जगासमोर आणण्यासाठी टाईमचे आभार. भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनीच देशाचे नाव धुळीस मिळवले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम मॅगझीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख दुफळी निर्माण करणारा नेता असा करण्यात आला आहे. त्यावरून धनंजय मुंडे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मुंडे यांनी याबाबत ट्वीट केलं असून यामध्ये त्यांनी टाईम मॅगझीनने वेळोवेळी ‘व्हीलन नंबर १’ चा खरा चेहरा समोर आणला आहे. भारतातील खरी ‘तुकडे तुकडे गँग’ आणि त्यांच्या प्रमुखाला जगासमोर आणण्यासाठी टाईमचे आभार. भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनीच देशाचे नाव धुळीस मिळवले असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS