सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे म्हणतात…

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे म्हणतात…

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशास स्थगिती दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दलासा मिळाला असून सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है… जज्बा है परिवर्तन का ज़िंदगी में इसलिए सफर जारी है…!, असं ट्वीट मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान राजाभाऊ फड यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला होता.या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. शुक्रवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशास स्थगिती दिल्याने मुंडे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आज सकाळी धनंजय मुंडे यांच्यासह
चंद्रकांत रणजीत गिरी, ज्ञानोबा सीताराम कोळी, गोविंद सीताराम कोळी, बाबू सीताराम कोळी, उद्धव कचरू सावंत, माणिक तुकाराम भालेराव, विठ्ठल गणपतराव देशमुख, धोंडीराम अण्णा चव्हाण, दिगंबर वसंत पवार, राजश्री धनंजय मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक बाबुराव कराड आणि सूर्यभान हनुमंतराव मुंडे या १४ जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशास स्थगिती दिल्याने मुंडे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

COMMENTS