सोलापूरच्या पैलवानाचा प्रण पूर्ण,  चांदीची गदा देऊन केले धनंजय मुंडेंचे स्वागत !

सोलापूरच्या पैलवानाचा प्रण पूर्ण, चांदीची गदा देऊन केले धनंजय मुंडेंचे स्वागत !

परळी – सोलापूर येथील प्रसिद्ध पैलवान सनी देवकते यांनी धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्री होत नाहीत तोपर्यंत कुस्ती जिंकून सुद्धा फेटा किंवा गदा स्वीकारणार नाही असा प्रण केला होता; आज परळी येथे येऊन त्यांनी ना. मुंडे यांचा चांदीची गदा व मानाचा टायटल पट्टा देऊन देवकते यांनी सत्कार केला. तर ना. मुंडे यांनीही पैलवान सनी देवकते यांना फेटा बांधून त्यांचा प्रण आज पूर्ण केला.

केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात धनंजय मुंडे यांचा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात चाहता आहे, याचा अनेकवेळा प्रत्यय येतो. सोलापूर येथे धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठाण च्या मार्फत सामाजिक कार्य करणारे पैलवान सनी देवकते व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर केलेल्या या पणाची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. प्रण केल्यानंतर अनेक वेळा सनी देवकते यांनी कुस्ती जिंकून सुद्धा फेटा किंवा गदा स्वीकारले नव्हती आज सनी देवकाते यांनी नामदार मुंडे यांना चांदीची गदा देऊन फेटा बांधला व त्यानंतरच स्वतःला फेटा बांधून घेतला.

दरम्यान आज ना. मुंडे हे राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर आपला प्रण पूर्ण झाल्याने समाधान मिळाल्याचे सनी देवकते म्हणाले. तर ना. मुंडे यांनीही आपल्या या चाहत्याचे फेटा बांधून कौतुक केले.

COMMENTS