“धनगर आरक्षणावरुन भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर, जसे सत्तेवर आणले तसे सत्तेवरुन खेचू !”

“धनगर आरक्षणावरुन भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर, जसे सत्तेवर आणले तसे सत्तेवरुन खेचू !”

नागपूर- धनगर आरक्षणारुन भाजप खासदारानं सरकारला घरचा अहेर दिला आहे. सरकार सकारात्मक असले तरी आता फार विलंब होता कामा नये. आरक्षण मिळालं नाही तर भाजपला आम्ही सत्तेवर आणले तसे सत्तेवरून खेचूही शकतो असा इशारा भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला आहे.

दरम्यान काल खासदार महात्मे यांनी धनगर समाजाच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी सरकारला हा इशारा दिला असून दर सहा महिन्यांनी अहवाल लवकरच येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता आमचा संयम संपण्याच्या मार्गावर आहे. आरक्षणावर समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. हा प्रश्न आम्ही राज्यसभेतही उपस्थित केला होता. भाजप सरकार त्यावर सकारात्मक असले तरी आता विलंब होता कामा नये. आणखी विलंब झाल्यास समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार असल्याचंही यावेळी महत्मे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS